पंढरीची वारी म्हणजे श्रद्धेचा, समतेचा आणि भक्तीचा अखंड उत्सव...
प्रत्येक पावलागणिक घुमणारा "ग्यानबा तुकाराम" नावाचा गजर, लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांतील अढळ विश्वास आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस समाधान मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.
वारीत चालताना नकळत मनही त्या भक्तिरंगात रंगून जाते. प्रत्येक नामस्मरण अंतर्मनाला स्पर्श करत जाते... इथे प्रत्येकाच्या मनात असते विठूमाऊलीच्या चरणी अढळ श्रद्धा...
हा अनुभव फक्त जगता येतो... आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा असतो.
॥ विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल! ॥
#
Maharashtra# #
Solapur# #
Wari# #
जयहरीविठ्ठल#