注册并分享邀请链接,可获得视频播放与邀请奖励。

CMO Maharashtra (@CMOMaharashtra) “॥ अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस” — TopicDigg

CMO Maharashtra 的个人资料封面
CMO Maharashtra 的头像
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
加入 July 2014
0 正在关注    0 粉丝
॥ अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासमवेत वारकऱ्यांसोबत चालत वारीचा भक्तिमय अनुभव घेतला. वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माऊलींकडे "राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे घातले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील 2 वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे. वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे. शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore #Maharashtra# #DevendraFadnavis# #Wari# #जयहरीविठ्ठल#
显示更多